दैवाला धोका

किती मारू तुला हाका,
ये आपण पण देऊ दैवाला धोका,
त्याने दाखवला स्वभाव फसवा,
किती वाहायची आपण या आसवां.

प्रेम ना कळले त्याला आपले,
कदाचित आपल्याला पापिंमध्ये नापले,
म्हणूनच तर विरहाशी भेट घडवली,
आणि दीर्घ काळ प्रेमाची खिल्ली उडवली.

त्यासमोर टाहो फोडून रडलो,
साष्टांग चरणी पडलो,
तरी ही ना त्यास आली दया,
सारी तडफड गेली वाया.

म्हणूनच आलोय तुझ्या चरणी,
जगणे मरणे चालेल तुझ्या कारणी,
दैवाची मन-मानी नाही होत सहन,
किती करायचे असे स्वतःचे दहन.