दोघे

नको आता अंत पाहू,
दे स्वतःला प्रवाहात वाहू,
प्रवाह आहे प्रेमळ शुद्ध,
तुझा एक पाऊल करेल विरहाला रद्द.

हवं तर मला कुचकामी मान,
पण विसरू नको घेतलेली आणं,
आणं होती सोबत जगण्या मारण्याची,
आणि नव्हती विरह सहन करण्याची.

त्याला सहन केले तरी,
मापता नाही आली आपल्यातील दरी,
केवळ घेतच राहिलो झेप,
बदल्यात मिळतच राहिली चेप.

खूप प्रयत्न केले मी इकडे,
पण सारेच पडले तोकडे,
आता तू ही प्रयत्न कर तिकडे,
दोघे जोडू विखुरलेले तुकडे.