नाही

नको ना नाही म्हणू,
किती डोळ्यात पाणी आणू ?
आता तर ते ही संपत चालले,
पण हे तुला कसे ना कळले ?

आल्या विरहात माझीही होती चूक,
या सार्‍याचे झालेही दुख,
आजही भडकते पश्चातापाची ज्वाला,
आधीच कसे कळले ना मला ?

या ज्वालेने बसू नाही दिले स्वस्थ,
तुला शोधण्यात कायम राहिलो व्यस्थ,
शोधत, आवाज देत राहिलो दुखे पर्यंत घसा,
पण मिळत नाही कुठे अटकलाय तुझा फासा,

कामी येईना माझी करणी,
म्हणून आलोय तुझ्याच चरणी,
एकदातरी भेटायला ये परत,
“नाही” नाही म्हणणार अशीच अपेक्षा आहे करत.