ना वैर ना गैर

ना कुणाशी होते वैर,
ना कधी वागलो गैर,
केवळ साधा राहिलो बनून,
विरहाची शिक्षा भोगतोय म्हणून,

नाही तुझे ऐकले निट,
म्हणूनच तर नाही ना आला माझा वीट,
नेहमी म्हणायचीस ओळख जग,
पण हुल्लडबाजीची भलतीच होती रग,

रग लवकरच उतरली,
जाणं लगेच अवतरली,
पण दुरावली होतीस तू तोवर,
जाणीवेत एकट्याचाच उरलेला वावर,

एकटेपणाचा वीट आला फार,
विरहाला चांगलीच होती धार,
तरीही ना वैर ना गैर,
केवळ नशीबच होतोय स्वैर.