निर्णय

काय आहे तुझे म्हणणे,
का आवडते तुझ प्रकरण ताणणे,
एकदाचा निर्णय घेऊन टाक,
विरहाची नाहीतर प्रेमाची कर राख.

झगडलो पलटाया दैवाचा घाट,
एवढी वर्षे तुझी बघतोय वाट,
ना तू आलीस ना दैव हरले,
आयुष्यभरासाठी असेच लढणे ठरले.

कदाचित माझ्या प्रेमात कमी होती,
म्हणूनच तर कायम तुझी भीती,
या भीतीने दैवाचे ही वाढले असेल बळ,
उत्तरोत्तर वाढतच आहे त्याची कळ आणि झळ.

तरी आज ही आहे मार्गी दटून,
एकदा तरी तू पहावेस मला भेटून,
मी तर आता मार्गातून सरणार ना मागे,
पण एकदा तुझा निर्णय तू घे.