पटवणे

चालूच पटवणे तुला माझे म्हणणे,
न पटल्याने चालूच डोळ्यात पाणी आणणे,
वर्षानु – वर्षे चालू ठेवले हेच,
आता तर पत्थीच पडलय खाणे ठेच.

जीव तर अफाट लावला एकमेकांनी,
पण थोडासा माखलो हुल्लडबाजीतल्या चुकांनी,
दैवाने याचाच घेतला फायदा,
थोपला आपल्यावर विरहाचा कायदा.

पण या कायद्याला मी ना कधी मानले,
मोडकळीत आणण्यास प्रयत्ने आणले,
कधी समजावले कधी तुला शोधले,
परिस्थितीनुसार हवे ते प्रयत्ने साधले.

पण फुकट गेले तन मनाचे वाद्य,
अद्याप काहीच ना झाले साध्य,
आजही चालूच परतीसाठी समजावणे रडणे,
शिवाय कधीच ना जमणार यांना सोडणे.