प्राण

डोळ्यात आणून प्राण,
मागतोय तुझ्याकडे जीव दान,
करतोय अपेक्षा देशील,
प्राण वाचवाया नक्की येशील.

देवाला वाहिल्या अगरबत्त्या धूप,
विनवण्या केल्या खूप,
पण त्याने ही समजला पोरका,
त्याचं वागनही इतरान सारखा.

कळे ना माझे कुठे चुकले,
शोधून तुला हात पाय थकले,
पण ना तू ना बातमी भेटली,
चोहीकडे निराशा दाटली.

अखेर प्राण आले कंठाला,
आता तरी करू नको कंटाळा,
वाचवायचं कि नाही तू ठरव,
एकतर विरहाला नाहीतर मला हरव.