मदत दे

पुनर्भेटीच्या योजना आहे रोज आखत,
पण विरह माझे एक नाही ऐकत,
म्हणूनच तुझ्याकडे पसरतोय हात,
इवलीशी मदत दे कराया विरहावर मात,

काहीतरी तुझी अडचण असेल,
पण त्यावर मार्ग नक्की दिसेल,
तू हारू नको हिम्मत,
विरहाची वाढवू नको किंमत,

चालूच आहे लढाई माझी,
आणि शेवटपर्यंत ठेवीन ताजी,
तू अजिबात बाळगू नको भीती,
पेलीन संकटे येतील किती,

तू एकच कर काम,
आपल्या वचनावर रहा ठाम,
आणि कुठे आहेस ते हळूच सांग,
पार करेन ही दुनिया अथांग.