वचन

दिलेले वचन मोडले ना भले,
पण ते पूर्णत्वास ही नाही नेले,
गरजेची आहे एकाची निवड,
त्यासाठी तरी भेटायला काढ सवड.

एक मेकांसाठी सोबत जगणे मरणे,
वचनात होते जीवापाड प्रेम करणे,
कसेही पाळायचेच होते हे वचन,
मी आज ही करतोय त्याचेच वाचन.

पण पुढे अवघड झाली वाट,
कशी कळे ना पडली विरहाशी गाठ,
या गाठीने भलताच घातला घाट,
हरपून गेला सारा प्रीतीचा थाट.

तरी वचनाला पोहोचू ना दिला धक्का,
पूर्ततेवर अडून राहिलो पक्का,
वाटते आता तू ही तुझा निर्णय घ्यावा,
हवी तर उभारी नाहीतर विराम द्यावा.