वादळ शमले ?

कळे ना तुला कसे जमले ?
दुराऊन तुला कसे करमले ?
जमल्यास मलाही सांग उपाय,
ज्याने चालेल भले झाले अपाय.

तुझ्याशिवाय मी जगू नाही शकत,
हेच बोलत असायचो आपण थकत,
पण या विरहात तर वर्षे लोटली,
अशक्य वाटणार्‍या बाबीला कधीच गाठली.

मात्र सुख ना मिळाले असे करून,
मरण यातना भोगल्या विरहात झुरून,
तुझ्या शोधत, यातनांच्या क्रोधात बराच फिरलो,
पण शरम वाटते अपयशी ठरलो.

पण वाटते तू असशील सुखात नांदत,
शोध – कार्यात ना मिळत तुझी मदत,
म्हणून वाटले तुझे मन विरहात रमले,
ते मलाही उपाय पाठव ज्याने तुझे वादळ शमले