विरहाला प्रेमाचा अभाव

बदलणार नाही खर्‍या प्रेमाचा नियम,
वर्षानुवर्षे धरून ठेवलाय सयंम,
कधीतरी परत येशील हीच आहे आशा,
हीच अशा देते जगण्याला नशा.

जीवापाड आपले प्रेम होते,
सयंम याचीच साक्ष देते,
लहान थोरांचे शिक्षण सारे,
हे वागणे जाणार नाही कोरे,

सोबतच धरले प्रयत्नांची कास,
दोघे मिळून करतील विरहाचा नास,
पाहता पाहता संपेल विरहाचे सत्र,
पुन्हा मिळेल आपल्याला प्रेमाचे छत्र,

तुही आस नको सोडू,
नको विरहाशि संधान जोडू,
त्याचा लागणार नाही निभाव,
त्याला आहे खर्‍या प्रेमाचा अभाव.