शोधत जगणं

तसा वागण्यात नव्हता स्वार्थ,
कळत नव्हता विरहाचा अर्थ,
अल्लडबाजीची चढलेली नषा,
दिसल्या नाही धूसरलेल्या दिशा.

या अल्लडबाजीचे बरेच असतात शिकार,
पण विरह सार्‍याना नाही देत होकार,
का निवड झाली आपली,
आणि ती आजवर जपली.

निवडीचा राखला मान,
पण प्रेमावरून हटले नाही ध्यान,
तुझ्यासाठी झालो वेडा पिसा,
सुरुवातीला रडलोही ढस ढसा.

विरहाचा अर्थ कळून अल्लडबाजी संपली,
माझी ही झुंज त्याच्याशी जुंपली,
कोण कुणाला संपवतो हे राहील बघणं,
पण तोवर आहे तुझ्या शोधात जगणं.