श्रेय

तुझ्या शिवाय जगणे ते कसले,
आज जगतोय, आयुष्य आहे फसले,
एक उद्देश एकच ध्येय,
तुला शोधले तरच घेईन प्रेमाचे श्रेय.

दिवस ढकलत आहे एक एक,
ओलांडायची आहे विरहाची रेख,
त्यासाठी नवे नवे मार्ग आहे शोधत,
स्वतःवर जगण्याचा निर्बंध आहे लादत.

कधीतरी येईलच तो दिवस,
पुरा होईल केलेला नवस,
तू परतशील माझ्याकडे बंधने फेकून,
आणी विरह पळेल धूम ठोकून.

पण त्यासाठी जगून लागेल फसवे,
सार्‍यांशी खोटे खोटे लागेल हसावे,
श्रेयाची तशी नव्हती कधी भूख,
पण काय करू, तुझ्यात सामावलंय सरं सुख.