सार्‍या जगाला कळेल

नशिबाचा सारा दोष,
निमित्त तुझ्या घरच्यांचा रोष,
दिसले ना कुणास प्रेम खरे,
सार्‍याना वाटले तारुण्याचे वारे.

सार्‍यांची फिकीर मी ना केली,
नयने तुझीच दिसली ओली,
काही कळण्याआधी नशिबाने खेळली खेळी,
विरहाने घेतला प्रेमाचा बळी.

पण तडफड झाली अनावर,
जमले नाही करणे सावरा सावर,
म्हणूनच कधी बसलो नाही स्वस्थ,
आजही तुझ्याच शोधत आहे व्यस्त.

तुझ्यावर आजही तेवढाच आहे विश्वास,
कधीतरी कळेलच माझा गुदमरलेला श्वास,
कळताच येशील सारे टाकून,
पुन्हा देशील स्वताला माझ्यावर झोकून.

असा निरंतर पाहीन तुझी वाट,
सोडणार नाही अवघड वळणांचा घाट,
कधीतरी या प्रेमाला न्याय मिळेल,
आपली प्रीत सार्‍या जगाला कळेल.