हरलो पण नाही पडलो

कधी स्वप्नी तर कधी पाहिली भासात,
मनीच नाही जपले तुला श्वासात,
कधीच नव्हते एवढे केले प्रेम,
पण शेवटी नशिबाने वाजवलाच गेम.

सार्‍यांवर ठेवत गेलो विश्वास,
वाटलेच नाही कोणी दाबेल श्वास,
जीव तेवढा वाचला,
विरह थय थय्या नाचला.

पण म्हणून संपली नव्हती रग,
पुन्हा फुलवायचे होते जग,
म्हणून जगण्याला दिला ना नवा अर्थ,
तुझ्या भेटीत मानले सारे स्वार्थ.

भटकतोय आज बनून स्वार्थी,
ना सोबती ना आहे कोणी सारथी,
सार्‍या मोर्च्यांवर एकटा लढलो,
हरलो पण अद्याप तरी नाही पडलो.