हवी आहे मला सुटका

हवी आहे मला सुटका,
पण कधी भरतील विरहाच्या घटका,
त्यासाठी एक करतोय दिन रात्र,
पण अद्याप मी होत नाही पात्र.

आता वल्गना ठरेल व्यर्थ,
पण कळत नव्हता विरहाचा अर्थ,
जेव्हा त्याने आपणास जखडले,
तिथेच होते सारे स्वप्ने रखडले.

पण कधीच मानली ना ही पकड,
अद्यापही उतरली ना अकड,
सुरुवातीपासूनच झगडतोय व्हावया सुटका,
पण अद्याप ही चालूच हा मटका.

माझी कमी पडते उडी,
तुझ्याकडून होईल का मदत थोडी,
बदल्यात तू वाट्टेल ते माग,
पण ये पुन्हा फुलवू प्रेमाची बाग.