हिम्मत

आणखी तुला समज देऊ कशी,
अजून ही बदलू शकते आपली राशी,
गरज प्रयत्नांची माझी तुझी थोडी,
घेऊन हाती हात मारू उंच उडी.

माझी प्रयत्ने झाली करून,
आजही आहेत ती जीव धरून,
यश आता नाही दूर जास्त,
करावाच लागेल विरहाचा अस्त.

मला आहे यशाची हमी,
पण प्रयत्न पडतात कुठेतरी कमी,
अद्याप सफलता मिळाली नाही पुरेशी,
तुझ्याही प्रयत्नांची गरज आहे जराशी.

म्हणूनच एकीकडे तुला शोधत फिरतोय,
दुसरीकडे तुझी समजूत काढतोय,
केवळ एकदा ओळख आपल्या प्रेमाची किंमत,
किमान आवाज देण्याची तरी कर हिम्मत.