नव्हतं पण…

नव्हतं तुला सतवायचं,
मनात खोलवर होतं रूतवायचं,
वाटलेले नवीनच आहे हे बंधन,
सारी दुनिया करेल वंदन ; पण…

नव्हतं तुला हरायचं,
तुझ्यासाठी होतं जगायचं आणि मरायचं,
आणखी नव्हता कसला मोह,
विस्तारायचा होता आयुष्याचा तुंबलेला डोह ; पण…

नव्हतं विरहाला द्यायचा थारा,
लवकर वाजवायचे होते त्याचे बारा,
त्यासाठीच केली खटाटोप सारी,
आज ही चालू आहे त्याची वारी ; पण…

नव्हतं नियतीचा खायचा मार,
मी ही करायला शिकलेलो वार,
आजवरच्या इतिहासातून घेतले दीक्षा,
तुझ्या एका संकेताची आहे प्रतीक्षा ; पण…

नव्हतं तुला रडताना बघायचं,
आजीवन हास्य होतं मागायचं,
मला हास्याची गरज नव्हती,
तुझा सुगंध होता अवती भोवती ; पण…

नव्हतं असं बरचसं मान्य,
खूप ठरवलेल अन्य,
होतं तुला पुन्हा भेटायचं,
त्यासाठी वाट्टेल तस होतं झटायचं ; पण…