तिथेच थांब

खूप गेलीस माझ्यापासून लांब,
आता तरी तिथेच थांब,
तुझा शोध अवघड झालाय आधीच,
कशाला अडचणी वाढवतेस उगीच.

कोणाच्या मदतीची नव्हती आशा,
सुरुवातीपासून शोधतोय तुझी दिशा,
दिशाहीन रस्ते मिळाले खूप,
आणि सोडावाही लागला घरचा तूप.

तरी मानली नाही हार,
आजही ठोठावतोय नशिबाचे दार,
पण धुसर वाट ही नाही दिसत,
तू आणखी दूर चालल्याचे आहे भासत.