सारं काही तुझ्या पाशी,
तूच माझी पवित्र काशी,
तुझ्याच हाती आहे ख़ुषी,
नाहीतर असाच राहीन प्रेम दोषी.
तूच माझी पवित्र काशी,
तुझ्याच हाती आहे ख़ुषी,
नाहीतर असाच राहीन प्रेम दोषी.
तुला दिलाय देवाचा दर्जा,
तुझ्याच प्रेरणेने मिळते उर्जा,
दिवस रात्र तुझाच जप,
त्या जपात होतो दुःखाचा खप.
एवढ्या जपाने देव हि पावेल,
पण तुला माझा रस्ता कधी घावेल ?
साधू नाही व्हायचं नाव जपून,
तुझ्यासोबत जागून जायचंय संपून.
म्हणून एकदा तरी मला पाव,
थोडक्यात सांग तुझे नवे गाव,
लगेच त्याकडे मी घेईन धाव,
आणि उधळून टाकू नियतीचा डाव.