आठवण आजही आहे ताजी,
तू नाही पण ती कायम राहिली माझी,
ऋतू मागून ऋतू सरले,
बाकी आमचे नाते केवळ उरले.
तू नाही पण ती कायम राहिली माझी,
ऋतू मागून ऋतू सरले,
बाकी आमचे नाते केवळ उरले.
तुझ्यावरील प्रेमाचा कधी झाला ना अस्त,
पण तुझी सोबत लाभली नाही जास्त,
तुझ्या नंतर सावरायला नव्हते कोणी,
तिने भूमिका बजावल्या दोन्ही.
अवघड होतं पचवणं नियतीचा घात,
पण एकटेपणात तिनेच दिली साथ,
कधी तर घ्यायला पाहिली तुझी जागा,
आणि फुलउनच ठेवले प्रीतीच्या जगा.
तुझी आठवण आहे हि अशी,
झोपेतच दूर रहाते कशी बशी,
तुझ्या सारखी तिला जाउ देणार नाही दूर,
आता तिच्यावरच अर्पण माझे सूर आणि उर.